नाशिक :- येथील गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एक तरुण व एक तरुणी अशा 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत.
कु. रिद्धी प्रशांत गुजराथी (वय 18, रा. खोडेनगर, पंचवटी) व नीरज रवींद्र धारणकर (वय 18, रा. काठे गल्ली, द्वारका) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर आर्यन फडकर (वय 17) व मृण्मयी अहिरे (वय 18) हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील दोन्ही मयत व जखमी हे एमटीडीसी येथील बोट क्लब येथे एमएच 12 एन बी 1458 या क्रमांकाच्या इटीओस गाडीने गेले होते. तिथून परतत असताना ते भरधाव वेगात येत होते.
बारदान फाटा येथे ते आले असता गाडीचे टायर फुटले आणि त्यांची गाडी 3 वेळा पलटी झाली आणि नंतर झाडावर जाऊन आदळली. गाडीमध्ये पुढे बसलेले चालक आर्यन व मृण्मयी हे या अपघातात बचावले. मात्र, इतर दोघांचा गाडीत दबून दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे घटनास्थळी दाखल झाल्या असून, पुढील तपास सुरू आहे.