नाशिक शहरात खुनाची मालिका सुरुच ! भल्यापहाटे झोपेतच पत्नीला संपवलं; मग स्वत:ही घेतला गळफास
नाशिक शहरात खुनाची मालिका सुरुच ! भल्यापहाटे झोपेतच पत्नीला संपवलं; मग स्वत:ही घेतला गळफास
img
Dipali Ghadwaje
नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने जिल्ह्याचं वातावरण पूर्णतः बिघडल्याच्या स्थितीत आहे. नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच असून खुनाच्या घटनांनी शहर हादरले आहे. अशातच आता पुन्हा एकदा शहरातील आडगाव परिसरामधील इच्छामणी नगरमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास पतीने पत्नीची हत्या करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या महिनुसार, बुधवारी (१३ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छानगरमध्ये ही घटना घडली. विशाल निवृत्ती घोरपडे आणि प्रीती विशाल घोरपडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. मृत विशाल घोरपडे पत्नी प्रीती घोरपडे हिच्यासह नाशिक शहरातील आडगाव परिसरातल्या इच्छामनीनगर येथे राहत होता. मंगळवारी रात्री काही कारणावरुन त्यांचा वाद झाला होता. 

दरम्यान, प्रीती गाढ झोपेत असताना विशालने बुधवारी पहाटेच्या सुमारास तिची हत्या केली. प्रीती झोपेत असताना विशालने घरातील मुसळीने तिच्या डोक्यात सपासप वार केले. या घटनेत प्रीतीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर विशालने घरातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, या शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पतीने पत्नीची हत्या करुन स्वत: ही गळफास घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशालने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group