कामटवाडे परिसरात चारचाकी वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
कामटवाडे परिसरात चारचाकी वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
img
दैनिक भ्रमर
नाशिक : चारचाकी वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना कामटवाडे परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साहेबराव सोनू सांगळे (वय 59) हे आपल्या घरातून कामटवाडे परिसरातून जात होते. तेव्हा अज्ञात चारचाकी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या छाती व पायाला जबर मार लागला.

सांगळे यांचा पुतण्या संकेत सांगळेने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group