नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- जय भवानी रोड वरील पाटोळे मळा येथे रात्री, पहाटे दर्शन देणाऱ्या बिबट्याने संध्याकाळची सफर केली. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अर्टलरी सेंटर च्या भिंतीवर तो बसून होता.मागे अनेकदा जय भवानी रोड वरील पाटोळे मळा, लोणकर मळ्यालगत असलेल्या अर्टलरी सेंटर च्या संरक्षण भिंती पार करून बिबट्या ने हैदोस घातला होता. अनेक श्वानाची तो शिकार त्यांनी केली आहे. वन विभागाने जवळपास या भागातून आठ ते दहा बिबटे जेरबंद केले आहे.
पाच ते सहा महिन्या नंतर आज संध्याकाळी पाटोळे मळा येथे लहान मुले खेळत असताना अर्टलरी सेंटर च्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून मानवी वस्ती कडे बिबट्या येताना दिसला. मुलांनी पालकांना सांगितल्या नंतर काही युवकांनी मोठ मोठा आवाज करून बिबट्या ला पळवले,व तो नंतर अर्टलरी सेंटर च्या संरक्षण भिंतीवर काही वेळ जाऊन बसला.त्यावेळी काही युवकांनी बिबट्या ला आपल्या मोबाईल मध्ये टिपले.
या भागातील मनसे शहर संघटक ऍड नितीन पंडीत यांनी वन अधिकारी वृषाली गाडे यांच्या सोबत चर्चा करून काही बिबट्याचे काही व्हिडीओ, फोटो त्यांना पाठवून पिंजरा लावण्याची मागणी केली.यावर गाडे यांनी वन अधिकारी या भागाची पाहणी करून पिंजरा लावतील असे आश्वाशन दिले. रात्री पहाटे हा बिबट्या पुन्हा मानवी वस्तीकडे येतो कि काय? अशी भीती शेतकरी, नागरिका मध्ये निर्माण झाली आहे.