‘तुम्ही वय काढू नका, हा गडी...’ ; शरद पवार यांचा विरोधकांना टोला
‘तुम्ही वय काढू नका, हा गडी...’ ; शरद पवार यांचा विरोधकांना टोला
img
दैनिक भ्रमर
अनेकजण ८४, ८५ वय झाले, असे म्हणतात. तुम्ही वय काढू नका. तुम्ही अजून काय पाहिलं आहे. हा गडी थांबणारा नाही.. ज्या लोकांनी साथ दिली. त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामे करत राहील, अशी ग्वाही शरद पवार यांनी यावेळी दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत विरोधकांकडून वेळोवेळी त्यांच्या वयावरून टिप्पणी केली जाते. याबाबत पवार यांनी मिश्किल टिप्पणी करीत विरोधकांना टोला लगावला. बारामती तालुक्यातील उंडवडी कप येथे दुष्काळी दौऱ्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले की, गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना त्यांच्या गुजरातला कृषिमंत्री असताना प्रचंड मदत केली. मी कधी असे बघितले नाही की, ते कोणत्या पक्षाचे आहेत. मी हे बघितलं, एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्या राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत केली पाहिजे, हे धोरण नेहमी राबवले. मागे एकदा मोदी यांनी बारामतीला येण्याची इच्छा व्यक्त केली. इथे त्यांनी भाषण केले. त्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी हे जे काही घडलो आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे की, हे काम कसे करायचे हे मला पवार साहेबांनी बोट धरून शिकवले. आज तेच पंतप्रधान वेगळी भूमिका घेत आहेत.

बसमध्ये बॉम्ब ; निनावी पत्राने 'या' बसस्थानकावर खळबळ

विरोधकांना तुरूंगात टाकले जाते

पवार म्हणाले की, कोणी वेगळी भूमिका घेतली तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यांना तुरुंगात टाकले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनाही जेलमध्ये टाकले आहे, असे टीकास्त्र पवार यांनी मोदी यांच्यावर सोडले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group