पुण्याहून नाशिककडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात ; अनेक प्रवासी जखमी ; एकाची प्रकृती चिंताजनक
पुण्याहून नाशिककडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात ; अनेक प्रवासी जखमी ; एकाची प्रकृती चिंताजनक
img
दैनिक भ्रमर
जिल्ह्यातील सिन्नर-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथे रविवारी चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला आहे. महाकाली ट्रॅव्हलची खाजगी बस पुण्याकडून नाशिकच्या दिशेने येत होती.

दरम्यान, समृद्धी महामार्गावरील ‘इंटरचेंज’ पॉइंटजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात पंधरा ते वीस जण जखमी तर चार-पाच प्रवाशी गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली आहे.

वावी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. जखमींना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघात नेमका कशामुळे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group