आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. वकील आनंद एस. जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मोदींना ६ वर्षांसाठी निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
आनंद एस. जोंधळे यांच्या याचिकेत मोदींच्या पीलीभीत, उत्तर प्रदेश येथे ९ एप्रिल रोजी झालेल्या भाषणाचा संदर्भ आहे. यावेळी मोदींनी कथितपणे शीख आणि हिंदू देवता आणि प्रार्थनास्थळांच्या नावावर मते मागितल्याचे म्हटले आहे.