आयपीएलच्या रनसंग्रामानंतर टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होणार आहे. दोन जून 2024 पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ विश्वचषकाचं अभियान पाच जून रोजी आयर्लंडविरोधात सुरु करणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी टीम इंडिया पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडणार आहे.
टी 20 विश्वचषकात टीम इंडिया कोणत्या प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार? कोण कोणत्या खेळाडूंना संघात स्थान मिळणार? याबातच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चा सुरु असतानाच भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग यानं टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर लवकरच विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करणार आहेत. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी कऱणाऱ्यांना संघात स्थान दिलं जाईल, असं अजित आगरकर यांनी आधीच हिंट दिली आहे.
त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्यांकडे भारतीय चाहत्यांच्या नजरा आहेतच. वीरेंद्र सहवाग यांनी प्लेईंग 11 ची निवड केली आहे. सहवागने निवडलेल्या संघात हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनला स्थान मिळालं नाही.
वीरेंद्र सहवागच्या संघात कोण कोण ?
भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सहवागनं टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली आहे. सहवागने आपल्या प्लेईंग 11 मध्ये हार्दिक पांड्याला स्थान दिले नाही. त्याशिवाय संजू सॅमसन आणि चहल यांनाही स्थान दिलेले नाही. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांना सलामीसाठी निवडलं आहे. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यासारख्या फलंदाजांना स्थान दिलेय. त्याशिवाय रिंकू सिंह अथवा शिवम दुबे यांच्यापैकी एकाला स्थान देण्याबात सहवागनं सांगितलं आहे. वीरेंद्र सहवागच्या संघात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यालाही स्थान मिळालेय. पण हार्दिक पांड्याचा पत्ता कट झालाय.
सहवागने कोणत्या गोलंदाजांवर विश्वास दाखवला
वीरेंद्र सहवागने आपल्या प्लेईंग 11 मध्ये कुलदीप यादव हा एकमेव स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज ठेवलाय. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. बुमराहच्या जोडीला मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा यांना स्थान दिले आहे. दरम्यान, यंदाचा विश्वचषकात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील मैदानात पार पडणार आहे. दोन जून पासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. सध्या जगभरातील बरेच खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली जाणार आहे.
वीरेंद्र सहवागनं निवडलेली प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह/शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा