चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आणखी एक स्टार गोलंदाज मुकणार
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आणखी एक स्टार गोलंदाज मुकणार
img
दैनिक भ्रमर
19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेतील सामने पाकिस्तान आणि दुबईत होणार आहेत. दरम्यान, एका पाठोपाठ एक दिग्गज खेळाडूंना दुखापतीने ग्रासल्याची मालिका सुरु आहे.

पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह या सारख्य दिग्गज गोलंदाजांना या स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्यात आता आणखी एक वेगवान गोलंदाज या स्पर्धेला मुकला आहे. 27 वर्षीय बेन सियर्सन मागच्या आठवड्यातच वनडेत डेब्यू केलं होतं. पाकिस्तानविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवली होती.पण पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम फेरीत तो संघाचा भाग नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजी बेन सियर्स याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्याऐवजी न्यूझीलंडच्या संघात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बेन सियर्स ऐवजी जॅकब टफी असणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, ‘कराचीमध्ये बुधवारी पहिल्या सराव सत्रादरम्यान सियर्सला डाव्या बाजूला हॅमस्ट्रिंगची दुखापत जाणवली. स्कॅननंतर त्याला दुखापत असल्याचं दिसून आलं आहे. त्याला यातून सावरण्यासाठी कमीत कमी दोन आठवड्यांचा कालावधी लागून शकतो.

यामुळे सियर्स दुबईमध्ये भारताविरूद्धच्या सामन्यात थेट दिसण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दोन सामने खेळू शकणार नाही.’ त्याची अशी स्थिती पाहता न्यूझीलंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना 19 फेब्रुवारीला पाकिस्तानशी होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group