MS Dhoniलाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ , पत्नीसह केलं पारंपरिक नृत्य ; व्हिडीओ होतोय व्हायरल
MS Dhoniलाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ , पत्नीसह केलं पारंपरिक नृत्य ; व्हिडीओ होतोय व्हायरल
img
DB
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली, मात्र तरी देखील धोनीची फॅन फॉलोईंग किंचितही कमी झालेली नाही. सध्या धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात यात धोनी आपल्या मित्र परिवारासोबत गुलाबी शरारा या गाण्यावर पारंपरिक पहाडी नृत्य करत आहे. 

एम एस धोनी सध्या त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत हिमाचल दौऱ्यावर आहे. तेथे तो सुट्ट्यांचा आनंद घेत असून देहरादूनमधील अनेक ठिकाण देखील पाहतोय. धोनीच्या या ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याचे फॅन्स सोशल मीडियावर टाकत आहेत.

सध्या व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये धोनी हिमाचलमधील पारंपरिक पहाडी नृत्यात सहभागी झालेला दिसतोय.  पारंपरिक नृत्य करणाऱ्या ग्रुप सोबत धोनी, पत्नी साक्षी आणि इतर मित्रमंडळी गुलाबी शरारा या गाण्यावर थिरकताना दिसतोय. गुलाबी शरारा हे हिमाचलच्या एका गायक संगीतकाराने तयार केलेलं गाणं मध्यंतरी देश विदेशात खूप प्रसिद्ध झालं होतं. धोनीचा हा नवा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असून चाहते त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

पाहा व्हिडीओ : 
 


 

इतर बातम्या
Join Whatsapp Group