टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया अखेर आज म्हणजेच गुरुवारी भारतात परतली आहे. सकाळी 6.30 च्या सुमारास टीम इंडिया दिल्लीच्या एअरपोर्टवर दाखल झाली. यानंतर आता भारताच्या सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट घेतली आहे.
टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज भारतात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खेळाडूंनी ब्रेकफास्ट देखील केला. यावेळी टीमच्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदींच्या हाती ट्रॉफी देत फोटो काढला आहे.
टीम इंडियाच्या पंतप्रधानांसोबतच्या भेटीतील प्रत्येक क्षण :
रोहित शर्माचं चाहत्यांना खास निमंत्रण
गुरूवारी भारतीय संघ विजयी परेड मुंबईत करणार आहे. यासाठी रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया.”