टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा पर्थ येथे होणार आहे. भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे.
भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी पात्र ठरेल. त्यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. एका बाजूला कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबत प्रशचिन्ह असताना अशात टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे या खेळाडूवर पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल याला दुखापत झाली आहे. शुबमनला पर्थमध्ये इंडिया ए विरुद्धच्या सामन्यात बोटाला दुखापत झाली. शुबमनला फिल्डिंगदरम्यान स्लीपमध्ये कॅच घेताना दुखापत झाली. शुबमनला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शुबमनवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. अशात गिल पर्थ कसोटीत खेळणार की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.