BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२४-२५ वर्षाच्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वार्षिक खेळाडू कराराची घोषणा केली आहे. टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांना ए प्लस श्रेणीमध्ये समाविष्ट केले आहे. या श्रेणीत भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहचा देखील समावेश आहे.
वार्षिक कराराच्या यादीत ३४ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात पहिल्या ए प्लस श्रेणीत ४ खेळाडू ; ए श्रेणीत ६ खेळाडू; बी श्रेणीत ५ खेळाडू आणि सी श्रेणीत १९ खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे. शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जितेश शर्मा, केएस भरत आणि आवेश खान यांना करारामधून वगळण्यात आले आहे.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी न झाल्याने बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्यावर कारवाई केली होती. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टॉप क्लास कामगिरी केली. अय्यरसह इशान किशनने देखील शानदार खेळी करत आहे. या दोघांनी बीसीसीआयने करारबद्ध केले आहे.
ए प्लस श्रेणी - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा
ए श्रेणी - मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, रिषभ पंत,
बी श्रेणी - सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर
सी श्रेणी - रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
बीसीसीआयच्या वार्षिक करारानुसार, ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये, ए श्रेणीतल्या खेळाडूंना वर्षाला ५ कोटी रुपये, बी श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ३ कोटी रुपये आणि सी श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला १ कोटी रुपये वेतन म्हणून दिले जाणार आहेत.