
६ ऑक्टोबर २०२४
नाशिकच्या समस्त क्रीडाप्रेमी व खास करून क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळतर्फे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची या नव्याने सुरू होत असलेल्या २०२४-२५ च्या हंगामात दोन महत्वाच्या सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे जानेवारीत नाशिकमध्ये पुन्हा रणजी ट्रॉफी सामन्याचा जल्लोष होणार असून त्याआधी नोव्हेंबर मध्ये सी के नायडू ट्रॉफीचा सामना होणार आहे. दोन्ही सामने नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होतील. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे तसे सर्व संबंधित राज्य संघटनांना कळविण्यात आले आहे.
हे दोन सामने म्हणजे :
१ : २३ वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफी साठी ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध केरळ हा चार दिवसीय सामना आणि
२ : रणजी ट्रॉफी करता महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा हा २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान होणारा दुसरा चार दिवसीय सामना.
Copyright ©2025 Bhramar