चेन्नई :- भारताने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत मालिकेतही 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत वि इंग्लंड दुसरा टी-२० सामना खूपच अटीतटीचा झाला.
दोन्ही संघांनी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कसुकता ताणून ठेवणारा चढाओढ कायम ठेवली.
तिलक वर्मा आणि रवि बिश्नोईच्या फलंदाजीने भारताला २ विकेट्सने दणदणीत विजय मिळविता आला. अटीतटीच्या या सामन्यात एकटा तिलक वर्मा शेवटपर्यंत मैदानात उभा राहिला आणि ७२ धावांची नाबाद खेळी केली.
भारताला अखेरच्या २ षटकांमध्ये १३ धावांची गरज होती. तिलक वर्मा आणि रवी बिश्नोई मैदानावर होते. पहिल्या २ चेंडूंवर तिलक वर्माने धाव घेतली नाही. तिसऱ्या चेंडूवर २ धावा घेत सर्वांच्या ह्रदयाचे ठोके वाढवले. यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव घेत तिलकने बिश्नोईला स्ट्राईक दिली आणि रवीने पाचव्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावला.
अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूत ६ धावांची गरज असताना तिलक वर्मा आणि रवी बिश्नोईने पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.