टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! कुणाला मिळाली संधी?
टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! कुणाला मिळाली संधी?
img
Dipali Ghadwaje
आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कॅपटन्सी करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तसेच युझवेंद्र चहल याची अनेक महिन्यानंतर टीम इंडियाची रिएन्ट्री झाली आहे. 

भारतीय संघाची निवड होण्यापूर्वी हार्दिक पंड्याला संघात घेणार की नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. यासह त्याला उपकर्णधारपदही देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत तो अष्टपेलू खेळाडू म्हणून संघात खेळताना दिसेल.

दरम्यान एका बाजूला अनेक खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला काही खेळाडूंना संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल आणि फिनीशर रिंकू सिंह या दोघांची निवड करण्यात आलेली नाही. रिंकू सिंह हा टी 20 वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार होता. त्याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलीय. 

त्यामुळे रिंकूला वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र निवड समितीने रिंकला डावललं आहे. रिंकू सिंहचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

निवड समितीने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर 4 खेळाडूंना राखीव म्हणून संधी दिली आहे. बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंमध्ये 2 फलंदाज आणि 2 गोलंदाजांना संधी दिली आहे. यामध्ये शुबमन गिल आणि रिंकू सिंह हे फलंदाज आहेत. तर खलील अहमद आणि आवेश खान हे दोघे गोलंदाज आहेत.

तर चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलच्या 17 व्या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवम दुबे याने बाजी मारलीय. शिवम दुबेने मुख्य संघाचं तिकीट मिळवलंय. शिवमने अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत अफलातून कामगरी केली होती. तसेच त्याने आयपीएलमध्येही बॅटिंग आणि बॉलिंगनेही आपली छाप सोडली. त्याला संधी मिळणार असल्याची चर्चा होती. अखेर शिवम स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलाय.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू :

शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

इतर बातम्या
Join Whatsapp Group