इंग्लंडचा माजी फलंदाज आणि सरेचा महान क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाले आहे. ग्रॅहम थॉर्प यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. ग्रॅहम थॉर्प यांनी ४ दिवसांपूर्वी १ ऑगस्टला ५५ वा वाढदिवस साजरा केला होता.
ग्रॅहम थॉर्प हे एका आजाराने बऱ्याच काळापासून त्रस्त होते. पण त्यांच्या आजाराचा खुलासा झालेला नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोमवारी सरेचा महान फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाल्याची माहिती दिली.
ग्रॅहम थॉर्प हे केवळ खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक म्हणूनही खूप लोकप्रिय होते. थॉर्प यांनी २००५ मध्ये न्यू साउथ वेल्सचे प्रशिक्षकपद भूषवले आणि त्यानंतर त्यांना इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक बनवण्यात आले. तरुण खेळाडूंना तयार करणे हे त्यांचे काम होते. २०१३ च्या सुरुवातीस, थॉर्प इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांचे फलंदाजी प्रशिक्षक बनले. २०२० मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान ते संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनले. २०२२ मध्ये थॉर्प हे अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक बनले, पण हे पद स्वीकारण्यापूर्वीच त्यांना गंभीर आजारानचे निदान झाले.