क्रिडाविश्वात शोककळा! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन
क्रिडाविश्वात शोककळा! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन
img
Dipali Ghadwaje
क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी आहे.  इंग्लंडचा 20 वर्षीय उदयोन्मुख खेळाडू जोश बेकर याचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाची पुष्टी त्याचा काउंटी क्लब वूस्टरशायरने केली आहे.

वूस्टरशायरचा फिरकी गोलंदाज जोश बेकर याचं वयाच्या 20 व्या वर्षी निधन झालं आहे. या बातमीने क्रीडा जगताला शोककळा पसरली आहे. 19 एप्रिल रोजी जोश बेकरने अखेरचा सामना खेळला होता. यंदाच्या हंगामात जोश बेकरने दोन काउंटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली होती. 19 एप्रिल रोजी किडरमिन्स्टरमध्ये तो डरहमविरुद्ध खेळताना दिसला होता.

जोश बेकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2021 पासून त्याच्या कारकिर्दीला सुरूवात झाली होती. आतापर्यंत जोश बेकरने 47 सामने खेळले होते. यामध्ये जोशने शानदार कामगिरी करत 70 विकेट त्याच्या नावावर केल्या होता. इंग्लंडकडून जोश बेकर अंडर-19 खेळला होता. जोश बेकरचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अजून सस्पेंस आहे. जोश बेकरच्या मृत्यूची वूस्टरशर क्लबने माहिती दिलीय, परंतु मृत्यू कशामुळे झाला, हे उघड केलेलं नाही.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group