आता सहनशीलतेचा अंत पाहू नका! सुप्रिया सुळे यांचा नाव न घेता अजित पवारांना इशारा
आता सहनशीलतेचा अंत पाहू नका! सुप्रिया सुळे यांचा नाव न घेता अजित पवारांना इशारा
img
Dipali Ghadwaje
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आजवरच्या प्रथेप्रमाणे प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत बारामतीमध्ये सभा घेत असतात. त्याप्रमाणे आज बारामतीमध्ये शरद पवार गटाची सभा संपन्न झाली. 

दरम्यान या सभेला सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांची आई प्रतिभा पवार, आमदार रोहित पवार आणि इतर नेते उपस्थित होते. या सभेत बोलत असताना सुप्रिया सुळे काहीप्रसंगी भावूक तर काही प्रसंगी अतिशय आक्रमक होताना दिसल्या. कुणाचेही नाव न घेता त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली.  

यावेळी "मी गेली आठ महिन्यापासून गप्प आहे. म्हणजे आम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही हा गैरसमज ठेऊ नये. माझ्या रोहितच्या आई बद्दल एक वेळ बोलला गप्प बसलो, दुसऱ्या वेळी गप्प बसू मात्र तिसऱ्या वेळी बोलला तर...आता सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता दिला आहे. बारामतीत आयोजित महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार आणि मी घराणेशाहीत आहोतच. शून्यातून विश्व कोणी निर्माण केले तर ते शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे मी, अजित पवार आणि सुनेत्रा पवार आम्ही तिघेही घराणेशाहीत आहोत. मी हे पार्लमेंटमध्येदेखील बोलले आहे. अजित पवार आणि मी घराणेशाहीत आहोत, हे नाकारून कसं चालेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जन्म झाल्यावर खाली हात येतात आणि खाली हात जातात. नाती तुटायला काही वेळ लागतो. मात्र नाती जपायला लागतात. माझ्या आणि रोहित आईच्या बोललात ठीक आहे. माझ्या मनगटात मोठी ताकद आहे, ती म्हणजे, माझी आजी शारदाबाईच्या बागड्याची. आज आमचे विरोधक आमच्या कुटुंबाचे वाभाडे काढत आहे. माझी लढाई नात्याशी नसून महाराष्ट्राच्या विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात आहे. बारामती म्हणजे शरद आणि शरद म्हणजे बारामती आहे. कोणी गैरसमज करुन घेऊ नका. विकास काही कोणी किंवा मी स्वतःच्या खिशातून करत नाही. त्यामुळे मी विकास केला नाही आम्ही मिळून विकास केला आहे. असही त्या यावेळी म्हणाल्या. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group