........म्हणून पतीने बुक्का मारून पाडले पत्नीचे दात
........म्हणून पतीने बुक्का मारून पाडले पत्नीचे दात
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दारू पिण्यास मनाई केल्याच्या कारणातून संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण करीत तोंडावर बुक्का मारून तिचे दात पाडल्याची घटना नानावलीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तेजश्री धनंजय खांबेकर (वय 31) व आरोपी धनंजय रमेश खांबेकर (दोघेही रा. नवजीवन पार्क, स्वराज ट्रॅक्टरच्या मागे, नानावली) हे दोघे पती-पत्नी आहेत. धनंजय खांबेकर यांना दारूचे व्यसन आहे. फिर्यादी यांनी पतीला दारू पिण्यास मनाई केली होती. त्यामुळे संतापलेल्या पतीसह सासू मंदाकिनी रमेश खांबेकर यांनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली, तसेच पतीने पत्नीच्या तोंडावर बुक्का मारून तिचे दात पाडले.

हा प्रकार दि. 17 मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास राहत्या घरी घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार काकडे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group