मनमाड ( नैवेद्या बिदरी ) : " आई नाहि तू वैरीण" या म्हणीचा प्रत्यय सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मनमाड रेल्वे स्थानकात आला.अवघ्या महिनाभराच्या बालकाला चालत्या गाडीतील बाथरूम मध्ये महिनाभराच्या बालकाला ठेवून पालक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मात्र सोमवारी रात्री चक्क पालकांनीच धावत्या गाडीतील बाथरूम मध्ये आपल्या जन्मदात्या बालकाला ठेऊन पसारा झाल्याने महिन्या भराच्या बाळाला सोडून देणारी ती आई नाही तर वैरीण आहे का? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री गाडी क्रं १७०५८ सिकंदराबादहुन मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेस मधील एका डब्याच्या बाथरूम मध्ये औरंगाबाद स्थानक सुटल्यानंतर लहान बालकाचे रडण्याचे आवाज आल्याने गाडीतील प्रवाशांनी या बालकाचे आई-वडिलांचे शोध घेतले.
मात्र मनमाड स्थानक येण्यापर्यंत या बालकाच्या पालकांचे शोध न लागल्याने अखेर प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि या महिन्या भराच्या बालकाला मनमाड स्थानकात उतरवण्यात आले. या महिनाभराच्या बालकाला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन नाशिक येथील बालसुधारगृहात रवाना आले. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून पालकांचा शोध घेत आहे. अशी माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिले आहे.