मोठी बातमी! कॅबिनेट बैठकीला फडणवीसांची दांडी
मोठी बातमी! कॅबिनेट बैठकीला फडणवीसांची दांडी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. एनडीएने 400 पारचा नारा दिला होता. प्रत्यक्षात 300 पार जातानाही घाम फुटला आहे. एनडीएला 292 मतं मिळाली. त्यातली 240 मतं ही भाजपची आहे. महाराष्ट्रात तर भाजपला मोठा सेटबॅक बसला आहे.

मुंबईसह काही जे भाजपचे गड म्हणून ओळखले जाणारे मतदारसंघ किंवा दिग्गज नेते मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेत. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होण्याचे संकेत असताना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक सुरू आहे. सह्याद्री अतिथीगृहात कॅबिनेट मीटिंग सुरू आहे. दुपारी 4 वाजता राज्य मंत्रिमंडळ बैठक आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गिरिश महाजन यासह भाजपचे,शिवसेनेचे प्रमुख मंत्री, सहभागी होणार आहे. पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केल्यानंतरच,फडणवीस सरकारमध्ये होणार पुन्हा कार्यक्षम होणार आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group