केस, दाढी ,कपड्यांवरुन राजकारण, रोहित पवार अन् राम शिंदेंमध्ये रंगला कलगीतुरा
केस, दाढी ,कपड्यांवरुन राजकारण, रोहित पवार अन् राम शिंदेंमध्ये रंगला कलगीतुरा
img
Dipali Ghadwaje
 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात कलगीतुरी रंगला आहे. काही दिवसांपूर्वी  राम शिंदे यांच्या राहणीमानावरून रोहित पवारांनी टीका केली होती, यावर राम शिंदे यांनी रोहित पवारांना उत्तर देत टोला लगावला आहे. 

मुंबईला गेल्यानंतर माणूस गोरा कसा होतो हे मला माहिती नाही आता तर कहरच झालाय माझं वय 38 मी तर युवाच आहे. मात्र त्यांनी वीस लाख रुपये देऊन कन्सल्टंट घेतलं असं मला कळालं आणि कन्सल्टनला काय सांगितलं तर रोहित पवरांना कॉफी करायचं….पण माझं वय तर कॉपी करता येणार नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. माझे पांढरे केस आमदार झाल्यानंतर समाजकारणात काम करत असताना झाले, काळे केस मी करत नाही कारण मला लपवा लपवी जमत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय. 

तर मतदारसंघातील सर्व प्रश्न त्यांना समजून चुकले आहे आता थेट माझ्या लुकवर आले आहे. मी ग्रामीण भागातील खेडुक माणूस आहे. मी पॅन्ट शर्ट घालत आहे त्यांनी माझ्या लुकवर बोलायला सुरुवात केली, याचा अर्थ समजून घ्या त्यांना इथले कोणतेही प्रश्न शिल्लक राहिले नाही, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे तर त्यामुळे माझ्या लुकवर बोलण्यापेक्षा त्यांनी मतदारसंघात पाच वर्ष काय काम केलं हे जनतेला सांगावं असा सवाल राम शिंदे यांनी रोहित पवारांना केला आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group