महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी संपन्न ,
महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी संपन्न , "या" आमदारांनी घेतली शपथ
img
Dipali Ghadwaje
आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी आज पार पडला. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा पार पडला.

विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडला. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.

राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे. नुकताच या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली.

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे

चित्रा वाघ (भाजप) विक्रांत पाटील (भाजप) बाबूसिंग महाराज राठोड (भाजप) मनीषा कायंदे (शिंदे गट) हेमंत पाटील (शिंदे गट) पंकज भुजबळ (अजित पवार गट) इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)
इतर बातम्या
Join Whatsapp Group