विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींचा वेग आला असून, निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्ष आपली रणधुमाळी आखत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतही वेगवेगळ्या भागात दौरे करत असून,शनिवारी संजय राऊत मालेगावमध्ये होते. मालेगावातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना संजयराऊतांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा (महाविकास आघाडी) उमेदवार कोण असेल, याबद्दल भाष्य केले
मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वय हिरे हेच महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार असतील. मालेगावची जनता त्यांना साथ देईल. मालेगावचे भावी आमदार तेच आहेत", असे सांगत राऊतांनी दादाजी भुसेंविसें रोधात अद्वय हिरे यांची उमेदवारी जाहीर करू टाकली.
संजय राऊत म्हणाले, "विधानसभेचे तिकीट मातोश्रीवरून दिले जाते. दिल्लीवरून दिले जात नाही. बच्छाव यांचेपुत्र त्यांच्या समर्थकांसह मला भेटले. मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वय हिरे हेच महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार असतील. मालेगावची जनता त्यांना साथ देईल. मालेगावचे भावी आमदार तेच आहेत", असे सांगत राऊतांनी दादाजी भुसेंविसें रोधात अद्वय हिरे यांची उमेदवारी जाहीर करू टाकली.