क्रिप्टो करन्सीमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक
क्रिप्टो करन्सीमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात मोबाईलधारकाने एका तरुणाची 25 लाख 25 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आदित्य मनोहर अहिरराव (वय 26, रा. कमलनयन सोसायटी, अयोध्यानगरी, अमृतधाम, पंचवटी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आदित्य अहिरराव हा पार्ट टाईम बिझनेसकरिता ऑनलाईन पोर्टलवर शोध घेत होता. त्यादरम्यान 9263855881 या मोबाईल क्रमांकधारक व्यक्तीने अहिरराव याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ऑनलाईन पार्ट टाईम बिझनेस असून, त्यासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. 

अज्ञात इसमाच्या या बोलण्यावर फिर्यादी अहिरराव यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे टेलिग्राम ॲप, तसेच बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी दि. 26 ते 31 ऑगस्ट 2023 यादरम्यानच्या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यांवर एकूण 24 लाख 25 हजार 505 रुपये जमा केले; मात्र एवढे पैसे भरल्यानंतर फिर्यादी अहिरराव यांनी संशयितांशी संपर्क साधला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळू शकला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर अहिरराव यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.







इतर बातम्या
Join Whatsapp Group