सावधान! राज्यात दोन दिवस पावसाचे, या भागांमध्ये मुसळधार बरसणार
सावधान! राज्यात दोन दिवस पावसाचे, या भागांमध्ये मुसळधार बरसणार
img
Dipali Ghadwaje

राज्यात जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस जुलै महिन्यात सक्रीय झाला आहे. राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बसरणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढचे दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्ती केली आहे. राज्यातील काही भागांत ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड मध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लोणावळ्यात मुसळधार पाऊस 

लोणावळ्यात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर बंधारे वाहू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना जवळपास असलेलं कुंडमळा येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागलेत. मावळात सतत पडत असणाऱ्या पावसाने येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून याचा आनंद पर्यटक घेऊ लागलेत.




इतर बातम्या
Join Whatsapp Group