Bhagur : पाईपलाईन कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
Bhagur : पाईपलाईन कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- नगरपालिकेने लिकेज असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी भर रस्त्यात खोदून ठेवलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वाराचा पडुन दुर्दैवी मृत्यु झाला. यामुळे भगूर शहरावर शोककाळा पसरली आहे.

भगूरला जाणारे आणि आसपास च्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. भगूरकर यांनी याबाबत एकत्र येत आवाज उठवून प्रशासनाची झोप उडवली. भगूर प्रशासनाच्या अधिकारी किंवा ठेकेदार यांनी तुळसा लॉन्स समोर भर रस्त्यात पाईपलाईन लिकेज असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवला. रात्री उशिरा काम होऊ शकले नाही. घरी जाताना कामगारांनी खड्डया भोवती कोणतेही फलक किंवा कुंपन घातले नाही.

शनिवारी दिवसभर पाऊस असल्याने या खड्ड्यात पाणी साचले. रस्त्या आणि खड्डा दिसेनासा झाला. यावेळी करंजकर गल्ली भगूर येथील अमित रामदास गाढवे (वय 40) हा तरुण दुचाकी वरून घरून निघाला व तुळसा लॉन्स समोर असलेल्या खड्ड्यात पडला. त्याच्या डोक्याला, मेंदूला जबर मार लागला.

हा अपघात सिसिटीव्ही मध्ये कैद झाला आहे. नागरिकांनी जखमी गाढवे यास प्रथम छावानी तर नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉ पगारे यांनी अमित गाढवे यास तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुली असल्याचे समजले.

दरम्यान, भगूर-देवळाली व इतर पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येऊन झालेल्या रस्त्याच्या दुर्दशे बाबत रस्ता रोको आंदोलन केले. याची दाखल लोकप्रतिनिधींनी घेऊन काम सुरु करण्याचे आश्वासन दिले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group