पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ''या'' दिवशी महाराष्ट्र दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ''या'' दिवशी महाराष्ट्र दौरा
img
दैनिक भ्रमर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.  पालघरमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण पोर्ट प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे. वाढवण हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक असेल. हे बंदर भारताच्या सागरी संपर्काला वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करेल.  पंतप्रधान 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करतील. व्हेसल कम्युनिकेशन आणि सपोर्ट सिस्टीमच्या राष्ट्रीय विस्तारांतर्गत, 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील यांत्रिक आणि मोटारीकृत मच्छीमार नौकांवर 1 लाख ट्रान्सपोंडर स्थापित केले जातील. पंतप्रधान मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित करतील. 

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांमध्ये मासेमारी बंदरे आणि एकात्मिक ॲक्वापार्क्सचे विकसन तसेच रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आणि बायोफ्लॉक यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा स्वीकार यांचा समावेश आहे. हे प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून माशांचे उत्पादन वाढवणे, मासेमारी-पश्चात व्यवस्थापन सुधारणे तसेच मत्स्य क्षेत्रात सहभागी असलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करणे या कार्यांसाठी निर्णायक ठरणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच उच्च दर्जाची सामग्री पुरवतील.

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी मासेमारी बंदरे, मासे ठेवण्याची केंद्रे यांचा विकास, अद्यायावतीकरण आणि आधुनिकीकरण तसेच मासळी बाजारांचे बांधकाम यांसह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय संबंधी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी देखील करण्यात येईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group