नाशिक : नाशिक उपनगर उपकेंद्रातून निघणारी डीजीपी नगर आणि शिवाजीवाडी (इंदिरानगर) उपकेंद्रातून निघणारी शनी मंदिर या दोन ११ केव्ही विद्युत वाहिनी वरील भाग उद्या सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी विद्युत पुरवठा बंद असणार आहे. वेळेपूर्वी काम झाल्यास वीज पुरवठा अगोदर सुरू होऊ शकतो, तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
उपनगर उपकेंद्रातून निघणारी डीजीपी नगर वाहिनीवर प्रभावित होणारा परिसर पुढील प्रमाणे साई संतोषी नगर वडाळा गाव, महाराष्ट्र कॉलनी, मदिनानगर, एस एन पार्क, गुलशन नगर, साठे नगर, मेहबूबनगर, सादिक नगर, स्मशानभूमी, विमानतळ परिसराचा समावेश आहे.
तसेच नाशिक शिवाजीवाडी (इंदिरानगर) उपकेंद्रातून निघणारी ११ केव्हीं शनी मंदिर वाहिनीवर प्रभावित होणारा परिसर खालील प्रमाणे आहे.
पाटील गार्डन, जाखळी नगर, आत्मविश्वास सोसायटी, सप्तशृंगी मिठाई समोरील रथचक्र चौक, पेठे नगर हा परिसर आहे. वेळेपूर्वी काम झाल्यास वीजपुरवठा अगोदर सुरू होण्याची शक्यता आहे. तरी या भागातील ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.