चितेगाव फाटा, सायखेडा परिसरात देशी बनावटीचे पिस्टलसह एकास अटक
चितेगाव फाटा, सायखेडा परिसरात देशी बनावटीचे पिस्टलसह एकास अटक
img
दैनिक भ्रमर
निफाड (भ्रमर प्रतिनिधी) :- आगामी सण-उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील चितेगाव फाटा परिसरात एका इसमावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

काल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे, सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चितेगाव फाटा शिवारात हॉटेल सन्मान परिसरात एक संशयीत इसम दहशत पसरविण्याचे उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगतांना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने चितेगाव फाटा, हॉटेल सन्मान परिसरात सापळा रचुन संशयीत किशोर दत्तु शिंदे, (वय २४, रा. जोशीवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) यास ताब्यात घेतले. सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळून आले. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचेविरूध्द सायखेडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरुध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल, तर नजीकचे पोलीस ठाण्यास संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, सपोनि श्री. संदेश पवार, पोहवा नवनाथ सानप, हेमंत गरूड, विनोद टिळे, मेघराज जाधव, संदिप नागपुरे, सुधाकर बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group