मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, म्हणजे काय ? फायदे आणि निकष काय ?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, म्हणजे काय ? फायदे आणि निकष काय ?
img
दैनिक भ्रमर
केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे.

अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार?

>> अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. 

>> भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं. 

>> अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. 

>> सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. 

>> प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं.

 >> भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात

1) भाषेचे साहित्ये हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते. 
2) भाषेतील प्राचीन साहित्य  मौल्यवान असावे. 
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group