मृत्यू हा कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही कारणाने ओढवेल याचा काही नेम नाही कधी कधी मोठ्यात मोठ्या दुर्घटनेतूनही माणूस बचावतो तर कधी एखादि छोटीशी गोष्टही मृत्यूचा दारात नेते. अशीच एक दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली आहे. शाळेचे गेट अंगावर पडून एका सहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लघुशंकेसाठी जात असताना शाळेचे गेट अंगावर पडल्याने करवीर तालुक्यातील केर्ले येथील कुमार विद्यामंदीर शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वरूप दिपकराज माने असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या विषयी अधिक महिती अशी की ,मृत विद्यार्थी दिपकराज माने हा नेहमीप्रमाणे आज शाळेत गेला होता. साडेआकरा वाजण्याच्या सुमारास त्याला लघुशंकेसाठी तो शाळेतून बाहेर आला होता. गेटजवळून तो जात असताना शाळेचे लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार जबर मार लागला. त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा शामराव माने यानां समजताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकानां या घटनेची माहिती दिली.
दिपककराजला गावातीलच एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्या पूढील उपचारासाठी विन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सी. पी. आर रूग्णालयात दाखल करा असे सांगितले. सी.पी.आर रूग्णालयात येण्यापूर्वी त्याचा मूत्यू झाला. सी. पी.आर रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.