महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला आहे. तर महाविकास आघाडीसाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे. दरम्यान आता महायुतीतील राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
तसेच, महायुती ऐतिहासिक विजयात लाडकी बहिण योजनेच्या यशासह ओबीसी समाजाकडून मिळालेला मोठा पाठींबा महत्त्वाचा ठरल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महायुती सरकारकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. राज्याच्या 50 टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दिलेले योगदान गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासारख्या प्रभावशाली पदासाठी पात्र ठरते, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान , मला फक्त विधानपरिषदेत जागा नको आहे. मला कॅबिनेट मंत्रालय - गृह, वित्त किंवा इतर कोणताही महत्त्वाचा मंत्री करा. मी यासाठी पात्र आहे कारण, मी राज्याच्या अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. तथापी, लक्ष्मण हाके यांनी ओबीसी कोट्यातील मराठा आरक्षणासाठी वकिली करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.