टेस्ट ड्राईव्हसाठी नेलेल्या  19 लाखांच्या ई-कारचा अपहार
टेस्ट ड्राईव्हसाठी नेलेल्या 19 लाखांच्या ई-कारचा अपहार
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली घेऊन गेलेल्या 19 लाख रुपये किमतीच्या ई-कारचा अपहार करणाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कपिल अशोक नारंग (वय 41, रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड, नाशिक) यांचे पाथर्डी फाटा येथे कार मॉल आहे.

या कार मॉलमध्ये आरोपी मनोज प्रकाश साळवे (रा. नाशिक) हा काल (दि. 22) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आला. त्याने जीजी 26 एबी 4848 या क्रमांकाची 19 लाख रुपये किमतीची एमजी इलेक्ट्रिक निळ्या रंगाची कार फिर्यादी कपिल नारंग यांचा विश्वास संपादन करून टेस्ट ड्राईव्हसाठी नेली; मात्र बराच वेळ होऊनही मनोज साळवे याने ड्राईव्हसाठी नेलेली कार परत न आणता तिचा अपहार केला.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात साळवेविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group