Nashik Crime : कर्मचाऱ्यानेच केली स्टर्लिंग मोटर्सची 37 लाखांची फसवणूक
Nashik Crime : कर्मचाऱ्यानेच केली स्टर्लिंग मोटर्सची 37 लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कंपनीला कोणतीही माहिती न देता अथवा कंपनीची परवानगी न घेता इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळणारे अतिरिक्त बिझनेस कमिशन स्वत:च्या फायद्याकरिता नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करून सुमारे 37 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवेक गोपाल माथूर (रा. नाशिक, मूळ रा. वाकड, पुणे) हे गडकरी चौकात असलेल्या स्टर्लिंग मोटर्स या कंपनीचे व्यवस्थापक आहेत. 
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी महेश शालिग्राम राठी (रा. पौर्णिमा अपार्टमेंट, भागवतनगर, नागपूर) हा या स्टर्लिंग मोटर्समध्ये काम करतो.

त्याने दि. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत या शोरूममध्ये काम करीत असताना कंपनीला कोणतीही माहिती न देता अथवा परवानगी न घेता इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळणारे अतिरिक्त बिझनेस कमिशन बेकायदेशीर मार्गाने स्वत:च्या फायद्याकरिता त्याची आई शकुंतला शालिग्राम राठी यांच्या बँक खात्यावर टाटा एआयजी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून मिळालेली 12 लाख 28 हजार रुपयांची व शीतल चावला इन्शुरन्स कंपनीची 1 लाख 40 हजार 120 रुपयांची रक्कम, भाचा पार्थ प्रशांत मुंदडा याच्या बँक खात्यावर स्पार्क कॉर्पोरेट, मॅग्मा जनरल इन्शुरन्स कंपनीचे 2 लाख 74 हजार 498 रुपये, बहीण माधुरी प्रशांत मुंदडा यांच्या बँक खात्यावर 2 लाख 50 हजार 785 रुपये, 11 हजार 73 रुपये, टाटा इन्शुरन्सचे 7 लाख 36 हजार 200 रुपये, मुलगा देवांश महेश राठी यांच्या खात्यावर 99 हजार 505 रुपये, 9 लाख 40 हजार 994 व 38 हजार रुपये अशी एकूण 37 लाख 19 हजार 575 रुपयांची रक्कम स्वत:च्या फायद्याकरिता नातेवाईकांच्या खात्यावर वळवून स्टर्लिंग मोटर्स या कंपनीची आर्थिक फसवणूक केली. 

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात महेश राठी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.

इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group