बेकायदेशीर रेल्वे तिकीट विक्री करणा-याला अटक
बेकायदेशीर रेल्वे तिकीट विक्री करणा-याला अटक
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी) :  रेल्वेची आरक्षित ई-तिकीटे आपल्या लॅपटॉप आणि मोबाइलवरून गरजू लोकांना त्यांच्या वैयक्तिक वापरकर्ता आयडीमधून काढून विकणा-यास नाशिकरोडच्या रेल्वे सुरक्षा बलाने अंबड पोलिसांच्या मदतीने अटक केली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल रघुबीरप्रसाद सिंग (33, अंबड) असे या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे भाड्यापेक्षा तो शंभर रुपये जास्त घेत असे. ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक हरफूलसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सह उपनिरीक्षक एन. के. राघव, मनोज कांबळे, किशोर चौधरी यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई केली. 

राहुल सिंग हा अंबड एमआयडीसीमध्ये वेल्डर म्हणून काम करतो. अधिक पैसे कमवायच्या लालसेपोटी आयआरसीटीसीच्या वेगवेगळ्या वैयक्तिक आयडीवरून रेल्वे आरक्षित ई-तिकीट काढून गरजू प्रवाशांना आणि त्याच्या ओळखीच्या लोकांना शंभर रुपये कमिशन घेऊन ते विकत असल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. 

त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये अनेक वैयक्तिक वापरकर्ता आयडी आणि जुने आणि नवीन रेल्वे आरक्षण ई-तिकीट त्याने काढून दिली. त्याचा एचपी कंपनीचा लॅपटॉप, मोबाईल पोलिसांनी पंचनामा करून अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. 

राहुल सिंगला नाशिकरोड आरपीएफ कार्यालयात आणण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शरद उईके यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. राहुल सिंगचा लॅपटॉप व मोबाईल उघडल्यानंतर 15 वैयक्तिक युजर आयडीॲक्टिव्ह तर 43 आयडी बंद आढळले. त्याच्या जवळून 14 रेल्वे आरक्षण ई-तिकीट, पाच जुने आरक्षण ई-तिकीट जप्त करण्यात आली. रेल्वे कायद्यानुसार सिंगला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group