Nashik : पैशांचे आमिष दाखवून मजुराचे धर्मांतर करण्याचा डाव हाणून पाडला
Nashik : पैशांचे आमिष दाखवून मजुराचे धर्मांतर करण्याचा डाव हाणून पाडला
img
दैनिक भ्रमर
अंबड - मजुराला पैशांचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अंबड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी, की अंबड औद्योगिक वसाहती जवळ असलेल्या घरकुल योजनेमध्ये राहणारे आणि मोल मोजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे मोहन राधाकृष्ण म्हस्के हे आज सकाळी आपल्या घराबाहेर खुर्ची टाकून बसले असताना या ठिकाणी एक विशिष्ट धर्म स्वीकारावा यासाठी म्हणून एक महिला आली.

तिने शेजारी असलेल्या समाज मंदिरामध्ये प्रवचन चालू आहे म्हणून तुम्ही जा त्यासाठी तुम्हाला मी पैसे देते असे सांगितले त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रवचन चालू होते आणि याप्रमाणे प्रवचनांमध्ये एका धर्माच्या विरोधात प्रचार केला जात होता आणि एका विशिष्ट धर्माचे प्रभू हे किती चांगले आहेत त्यांच्या गुणगान केल्यानंतर किती फायदे होतात या स्वरूपाची माहिती दिली जात होती.

यावेळी म्हस्के यांना धर्मांतर करा अशी माहिती देण्यात आली त्या दृष्टिकोनातून त्यांनी धर्मांतर करावे यासाठी म्हणून प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर याबाबतची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि विश्व हिंदू परिषद तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत पाऊले उचलली आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते श्रीकांत चौधरी, विजय चव्हाण, गौरव पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हा धर्मांतराचा डाव हाणून पाडला.

त्यानंतर म्हस्के यांना घेऊन हे सर्व कार्यकर्ते अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी आकाश कांबळे, प्रियंका कल्याणपुरी गोस्वामी, रेखा गुलाब अमोद, ज्योती गुरुदेव मोरे सर्व रा. अंबड यांच्या विरोधात अंबड औद्योगिक क्षेत्रातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव या अधिक तपास करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group