"या" तारखेपासून रंगणार भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
img
Dipali Ghadwaje
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. संघाची घोषणा आज म्हणजेच गुरुवार 30 नोव्हेंबरला होऊ शकते. अहवालानुसार, 2024 च्या वर्ल्ड कपसाठी ज्या खेळाडूंची निवड होऊ शकते त्यांनाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान मिळेल.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या T20 मालिकेने होणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील आणि शेवटी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबरला होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना 10 डिसेंबरला डर्बन येथे खेळला जाणार आहे. यानंतर दुसरा टी-20 12 डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जाईल आणि तिसरा आणि शेवटचा टी-20 जोहान्सबर्ग येथे 14 डिसेंबर रोजी खेळला जाईल.

यानंतर 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्ग येथे, दुसरा एकदिवसीय सामना 19 डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क येथे आणि तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळला जाईल. यानंतर 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये पहिली बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. दुसरी टेस्ट 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
 
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक

पहिला टी-20- 10 डिसेंबर

दुसरा टी-20- 12 डिसेंबर

तिसरा टी-20- 14 डिसेंबर

पहिला एकदिवसीय - 17 डिसेंबर

दुसरी वनडे- 19 डिसेंबर

तिसरी एकदिवसीय- 21 डिसेंबर

पहिली कसोटी- 26-30 डिसेंबर

दुसरी कसोटी- 3-7 जानेवारी

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group