मुलीच्या भविष्याची चिंता सोडा! दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार १० लाख; सुकन्या समृद्धी योजनेचा असा घ्या लाभ
मुलीच्या भविष्याची चिंता सोडा! दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार १० लाख; सुकन्या समृद्धी योजनेचा असा घ्या लाभ
img
नितीशा कुलकर्णी









मुलींसाठी सरकारणे अनेक योजना काढल्या आहेत. सरकारच्या या योजनांमार्फत मुलिंना मोफत शिकक्षण, त्यांच्या लग्नाचा खर्च, करिअरसाठी लाभदायक ठरत आहेत. तसेच त्याचे  शिक्षण, करिअर आणि लग्न या सगळ्याचे नियोजन करण्यासाठी  केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय योजना मानली जाते.

या योजनेत गुंतवणूक केल्यास सुरक्षित परतावा, आकर्षक व्याजदर आणि करसवलतींचा लाभ मिळतो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये या योजनेला मोठी पसंती मिळत आहे.

कमी गुंतवणुकीत मोठा निधी तयार करण्याची संधी

या योजनेत पालक आपल्या मुलीच्या नावाने नियमित बचत करून मोठा निधी तयार करू शकतात. दरमहा केवळ २००० रुपये गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन कालावधीत लाखोंची रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे लहान वयात गुंतवणूक सुरू केल्यास भविष्यात आर्थिक ताण कमी होतो.

खाते उघडण्यासाठी वयोमर्यादा आणि नियम

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत १० वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडता येते. या खात्यात किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये दरवर्षी गुंतवता येतात. गुंतवणूक १५ वर्षांपर्यंत करावी लागते, मात्र खाते २१ वर्षांपर्यंत सक्रिय राहते. विशेष म्हणजे, शेवटच्या ६ वर्षांत कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही, तरीही आधी जमा झालेल्या रकमेवर व्याज मिळत राहते.

व्याजदर आणि करसवलतींचा लाभ

सध्या या योजनेवर केंद्र सरकारकडून सुमारे ८.२ टक्के वार्षिक व्याज दिले जाते. हे व्याज तिमाही आधारावर खात्यात जमा केले जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यांतर्गत करसवलत मिळते. तसेच मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते, ही या योजनेची मोठी जमेची बाजू आहे.

२००० रुपये गुंतवणुकीवर किती मिळू शकते?

जर एखादा पालक दरमहा २,००० रुपये जमा करत असेल, तर वर्षाला २४,००० रुपये गुंतवले जातील. १५ वर्षांत ही रक्कम सुमारे 3.6 लाख रुपये होते. या गुंतवणुकीवर ८.२ टक्के व्याजदर आणि चक्रवाढ पद्धतीनुसार २१ वर्षांनंतर अंदाजे ९.५ ते १० लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. म्हणजेच मूळ गुंतवणुकीपेक्षा जवळपास तिप्पट रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

वेगवेगळ्या गुंतवणुकीनुसार मिळणारा परतावा
दरमहा १००० रुपये - अंदाजे ४.८ ते ५ लाख रुपये
दरमहा ३००० रुपये - अंदाजे १४.५ ते १५ लाख रुपये
दरमहा ४००० रुपये - अंदाजे १९ ते २० लाख रुपये
दरमहा ५००० रुपये - अंदाजे २४ ते २५ लाख रुपये

शिक्षणासाठी पैसे काढण्याची सुविधा
या योजनेत आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी जमा रकमेपैकी ५० टक्के रक्कम काढता येते. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत सहज मिळू शकते.

सुरक्षित आणि जोखमीविरहित गुंतवणूक पर्याय

सुकन्या समृद्धी योजना पूर्णपणे सरकारी हमीसह येणारी योजना आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही जोखीम नसते. तसेच बँकेतील मुदत ठेव किंवा इतर बचत योजनांच्या तुलनेत या योजनेचा व्याजदर अधिक असल्याने ती अधिक आकर्षक ठरते. त्यातच करसवलत आणि करमुक्त परतावा मिळत असल्याने ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानली जाते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group