नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये रोड शोला सुरुवात झाली आहे यावेळी विविध प्रकारच्या कलागुण सादर करत नाशिककरांनी या रोड शो ला मोठा प्रतिसाद देत फुलांची उधळण केली.
यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या रोड शो सहभागी झाले होते. या रोड शोसाठी विशेष अशी गाडी रथ म्हणून तयार केली गेली होती. त्यावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बागेत तयार करण्यात आलेल्या विशेष हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वागत केले.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष तयार करण्यात आलेल्या रथातून आपल्या रोड शोला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लाखो नागरिक हे हजर होते. या ठिकाणी नागरिकांनी हातामध्ये तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवत मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणात मोदी यांचे स्वागत केले. दरम्यान जागोजागी फुलांची उधळण होत होती
या रोड शोच्या दरम्यान नागरिकांनी जय श्रीराम च्या जयघोषाबरोबर नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा देखील दिल्या जात होत्या. दरम्यान कलाकारांनी आपला विविध कलाकृती सादर केल्या.
त्यामध्ये विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील तीन पावली नृत्य तसेच लेझीम नृत्य, पोवाडा, यासारखे उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील विविध कलाकृती यादरम्यान सादर करण्यात आल्या. नरेंद्र मोदी नागरिकांना हात जोडून अभिवादन करत होते.