कार सेवा प्रकरणी शिवसेनेचा सहभाग काय? हा प्रश्नच मुळी पोरकटपणाचा खा. संजय राऊत
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) आयोध्यातील बाबरी मशीद पतनप्रसंगी शिवसेनेचा सहभाग काय? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेला प्रश्नच मुळी पोरकटपणाचा असून असे प्रश्न तेच विचारू शकतात, असा टोला खा. संजय राऊत यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, नाशिक येथील महा अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात आल्यास त्यांना शिवसेनेचा काय सहभाग समजेल. म्हणून फडणवीस यांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने यावे असे मी त्यांना आमंत्रण देत असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
हॉटेल एस एस के येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने उद्या नाशिक नगरीत येत असून त्यांच्या उपस्थितीत धार्मिक व सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे माहिती खा. राऊत यांनी दिली.