नगर-मनमाड महामार्गावर अपघात, भीषण अपघातात  एकाचा जागीच मृत्यू
नगर-मनमाड महामार्गावर अपघात, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
देवळाली प्रवरा : रस्त्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, अशात राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावरील वाणी ओढा येथील हॉटेल ताईसाहेबसमोर चारचाकी वाहन व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे . दुर्दैवाने  या घटनेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे . 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , गुहा येथील शंकर साहेबराव खपके असे मृत व्यक्तिचे नाव आहे,  बुधवारी  सकाळी 11 वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहन एम एच .15 एफ व्ही. 3350 ने दुचाकिस पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकी स्वार हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पडला. त्याचवेळी शिर्डीकडे ऊस तोडणी कामगार घेऊन जात असलेल्या टक्ट्ररखाली सापडल्याने शंकर साहेबराव खपके (वय 55 वर्षे रा.गुहा) हे जागीच ठार झाले. 

दरम्यान अपघातस्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

घटनास्थळी सहायक पोलिस उपनिरीक्षक तुळशिदास गीते यांनी पंचनामा केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group