रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच मनमाड लासलगाव रोडवर रायपूर येथे खंडेराव मंदिराजवळ मोटरसायकल व इको गाडीचा समोरासमोर अपघात होऊन मनमाडच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणले प्रथमोपचार करून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं ?
मनमाड शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वय वर्ष 20 तर त्याचा मित्र बोरकरवाडी येथील रहिवासी योगेश पद्माकर अडांगळे वय 21 हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 बी ए 82 86 या गाडीने लासलगाव मार्गे विंचूर कडे निघाले होते याचवेळी रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको गाडी क्रमांक एम एच 19 डी व्ही 73 94 या गाडीसोबत समोरासमोर धडक झाली या धडके पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
यावेळी त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले मात्र मालेगाव कडे जात असताना अर्ध्या रस्त्यातच दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळतात रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नारळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेने संपूर्ण मनमाड शहरावर शोक कळा पसरली आहे.