सिडकोत स्कुल बसच्या धडकेत विद्यार्थी जागीच ठार
सिडकोत स्कुल बसच्या धडकेत विद्यार्थी जागीच ठार
img
DB

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : सिडकोतील त्रिमुर्ती चौकात स्कुल बसच्या धडकेत दुचाकीवरून जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला.

याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, राणाप्रताप चौकातील आर्यवत मध्ये राहणारा मयुर दत्ता गुंजाळ (वय १८) हा आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून त्रिमुर्ती चौकाकडुन सीटी सेंटर मॉलकडे जात असतांना गोली वडापाव सेंटर जवळ एका स्कुल बसने धडक दिली. या धडकेत मयुर गुंजाळ हा जागीच ठार झाला.

दरम्यान, या घटनेमुळे त्रिमुर्ती चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या अपघाताची माहिती अंबड पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी वाळूच्या ढंपरखाली तीन जण जागीच ठार झाले होते.

त्यानंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याची चर्चा सुरु होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group