आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावमध्ये ३ वाहनांना भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळविलेल्या माहितीनुसार , प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. ही मॅक्स ऑटो एसटी बसवर फेकली गेली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.