दुर्दैवी घटना : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; अपघातात एकाचा जागीच मृत्यू
दुर्दैवी घटना : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; अपघातात एकाचा जागीच मृत्यू
img
Jayshri Rajesh
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात तीन वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. अक्षय व्यंकटेश ढेले (वय ३०) असं अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तो गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर कार घेऊन जाणारा कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. मृताला खोपोली येथील रुग्णालयामध्ये दाखल केले.

मुंबई - पुणे एक्सप्रेस महामार्गावरील नवीन बोगद्याजवळ तीन वाहने एकमेकांना धडकली. त्यामध्ये कंटेनर वाहन क्रमांक एमएच ४३ सीई ३२१७, गॅस टँकर क्रमांक एमएच ०४ एचडी ९१९८, तर कार कंटेनर क्रमांक एनएल ०१ एडी ३१४६ ही वाहने एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये गॅस टँकरमधील चालक गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. अपघातात कारणीभूत असलेला कंटेनर चालक पळून गेला आहे.

घटनेनंतर वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत तत्परता दाखवत सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. बोगद्याच्या बाहेर वाहतूक थांबवण्यात आली होती.

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर सकाळी सातच्या सुमारास तीन वाहने एकमेकांना धडकून हा अपघात झाला आहे. यात कंटेनर, गॅस टँकर व कार कंटेनर एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये गॅस टँकरमधील चालक अक्षय व्यंकटेश ढेले (30) हा गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. अपघातास  कारणीभूत असलेला कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group