भीषण अपघात....! अलिशान कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला उडवलं
भीषण अपघात....! अलिशान कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला उडवलं
img
Dipali Ghadwaje
अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.  अशातच सुसाट वेगात असलेल्या आलिशान कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला जोरदार धडक दिली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  मात्र ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. तसेच बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जातोय.

याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलंय. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

कशी  घडली घटना ?
अपघातग्रस्त बस शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या बसमधून १५ विद्यार्थी प्रवास करीत होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात आलिशान कार आली. कार येत असल्याचं बघताच बसचालकाने ब्रेक मारला. मात्र, तरीही कारचा वेग अधिक असल्याने या कारने बसला समोरून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की बसचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केली. 
त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने कारचालकाला ताब्यात घेतले.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group