अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे , अशातच जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील डाकसुममध्ये कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सर्व लोक किश्तवाडचे रहिवासी होते. हे कुटुंब किश्तवाडहून सिंथान टॉप मार्गे मारवाहच्या दिशेने जात होते. त्यावेळी या कारचा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार JK03H9017 क्रमांक असलेली कार जम्मू भागातील किश्तवाड येथून येत होती त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डाकसुमजवळ रस्त्यावर उलटली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ५ मुले, २ महिला आणि १ पुरुषाचा (पोलीस) समावेश आहे.
अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे : इम्तियाज राथेर, गुलाम रसूल राथेर यांचा मुलगा, रा. किश्तावार, वय ४५ वर्ष. अफरोजा बेगम पत्नी इम्तियाज अहमद राथेर रा. किश्तावार, वय ४०. रेश्मा पत्नी माजीद अहमद, वय ४० वर्षे अरीबा इम्तियाज इम्तियाज अहमद यांची मुलगी, वय १२ वर्षे अनिया जान इम्तियाज अहमद यांची मुलगी, वय १० वर्षे इम्तियाजची मुलगी अबान इम्तियाज, वय ६ मुसैब माजिद माजीद अहमद यांचा मुलगा, वय १६ वर्षे माजिद अहमद यांचा मुलगा मुशाइल माजिद, वय ८ वर्षे.
दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात येत आहे.