चाचडगांव नजिक खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या वाहनाचा अपघात ,  एक ठार  तीन  गंभीर  जखमी
चाचडगांव नजिक खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या वाहनाचा अपघात , एक ठार तीन गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर
पेठ - नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील  चाचडगाव नजिक खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या नाशिककडून पेठ कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलोरोने आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्याने बोलोरो वाहन रस्त्याच्या कडेला फेकले जावुन. त्यातील वाहन चालक जागीच ठार झाला.तर तीघे गंभीर जखमी झाले आहेत.

नाशिक कडुन पेठ कडे जाणारी बोलोरो क्रमांक एमएच १५ के ८९४१ पेठ कडून नाशिक कडे जाणारी  आयशर क्रमांक(टी एन ५९ डी एक्स ३१५७ ला जोरदार धडक दिल्याने बोलेरो चालक मंगेश राजू हिरकुडे (२४) हा जागीच ठार झाला, तर पेठ पोलीस काशीम शेख व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी वर्षाराणी दशरथ आव्हाड व अमोल यांचे आडनाव कळू शकले नाही हे गंभीर जखमी झाले असून  नाशिकच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या अपघाताची माहिती दिंडोरी पोलीसांना  कळताच पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर,  उपनिरीक्षक जाधव , हवालदार गुलाब पवार,  साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पुढील तपास दिडोंरी पोलीस करीत आहेत .
इतर बातम्या
Join Whatsapp Group